मोहोळ- तालुक्यातील आष्टीचे विद्यमान सरपंच आणि पेशाने बालरोगतज्ञ असलेले डाॕक्टर अमित मधुकर व्यवहारे यांना कोरोनाकाळात केलेल्या ऊल्लेखनीय कामगिरीमुळे राष्ट्रीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान आणि आरोग्य व निसर्ग विकास संस्था बेळगाव यांच्याकडून दिला जाणारा ” वैद्यकीय गौरव पुरस्कार ” नुकताच जाहीर झाला. या संस्थेमार्फत महाराष्ट्र , कर्नाटक , गोवा राज्यातील सार्वजनिक क्षेत्रात ऊल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव केला जातो.
डाॕ.अमित व्यवहारे हे आष्टीचे विद्यमान सरपंच असून त्यांच्या पत्नी सौ.डाॕ प्रतिभा व्यवहारे मोहोळ पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य आहेत. त्यांचे वडील पेशाने डाॕक्टर असल्याने वैद्यकीय सेवेचा वारसा जन्मजात आहे. कोरोनाकाळात रुग्णांना मोफत सेवा देण्याबरोबरच त्यांच्या भोजनाची व्यवस्था जनपरिवर्तन संघ आणि सह्याद्री प्रतिष्ठान यांनी केली होती. ते स्वतः अध्यक्ष असलेल्या सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत मोठ्या प्रमाणात सामाजिक काम केले जातं. याच कार्याची दखल बेळगावच्या संस्थेने घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला
हा पुरस्कार मिळाल्याने जि.प. सदस्य विजयराज डोंगरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. आष्टी पंचक्रोशीतील सर्व स्तरातुन डाॕ. व्यवहारे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.