नवीन कार शोरूमला घेऊन जाणाऱ्या कंटेनर MH 12 एन एक्स 9834 हा ट्रक मोहोळ – मंद्रूप मार्गावरील नजीक पिंपरी जवळ चार चाकी गाडी आडवी लावून ट्रक चालकाला मारहाण करीत ट्रक मधील दोन पांढऱ्या रंगाच्या व एक काळ्या रंगाची कीया कंपनीचे चार चाकी गाडी विना नोंदणी केलेल्या गाड्या चोरट्यांनी चोरी केली. त्यानंतर चालक शिवम कुमार पांडे यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला त्यांच्या मार्गावर पाठवले असता मोहोळ पोलीस स्टेशनचे कर्मचारी तपासाची सूत्रे जलदगतीने फिरवून चोरी केलेल्या कारचे जीपीआरएस तात्काळ उपलब्ध करुन सदर कारचे लोकेशन हैदराबाद येथे असल्याचे निष्पन्न झाले.
तत्काळ सदर ठिकाणी पोलीस कर्मचारी रवाना होऊन शहानिशा केली असता सदर सर्व कार हे हैदराबाद येथील कुकुटपल्ली येथे रामदेवराव हॉस्पिटल मधील पार्किंग मध्ये असल्याचे समजले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सदर ठिकाणी जाऊन मिळून आलेल्या कारचे जवळ न जाता बाजूस कारवरती दबा धरून अंदाजीत चार तासानंतर चोरटे कारच्या जवळ आले, त्यांना याची कल्पना येण्याअगोदर सापळा रचून आरोपींना पकडण्यात आले, व मिळून आलेल्या तीन कार व तीन आरोपीला बेड्या ठोकण्यात आले.
१.नियाज रशिद मोहम्मद राहणार हातिन राज्य पंजाब २.शोएब मोहम्मद सय्यद वय वर्ष 35 राहणार हुबळी, राज्य कर्नाटक ३.शेखरगोंडा रामनजिन्या वय वर्ष 52 राहणार बेळलाली राज्य कर्नाटक या तिघांना ताब्यात घेऊन चोरीस गेलेल्या तीन कार जप्त करून मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले.
सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, हेडकॉन्स्टेबल शरद डावरे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश दळवी, कर्मचारी पांडुरंग जगताप, लखन घाडगे यांनी सदरची कामगिरी पार पाडले.अवघ्या चोवीस तासात ही कामगिरी केल्याबद्दल मोहोळ पोलिस स्टेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे.