टाकळी (टें) येथील युवकाच्या
निर्घृण हत्याप्रकरणातील संशयीत आरोपींचा जामीन मंजूर

टाकळी (टेंभुर्णी) ता-माढा, जिल्हा- सोलापूर
येथील रहिवासी नामे मंजुषा महादेव गोरवे यांनी दिनांक 20 जानेवारी 2021रोजी इंदापूर पोलिस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी नामे 1)विजय उर्फ दादा कांबळे रा- बावडा, 2)लकी विजय भोसले, 3) विकी उर्फ व्यंकटेश विजय भोसले, 4) महेश उर्फ शैलेश प्रभाकर सोनवणे यांना मयत संजय महादेव गोरवे (फिर्यादीचा मुलगा) याच्या निर्घृण खून करुन शरीरा पासून डोके, दोन्ही हात, दोन्ही पाय धारधार शस्त्राच्या सहाय्याने धडापासून वेगळे करुन भीमा नदीच्या पात्रात फेकून दिले होते. अशी तक्रार दाखल करण्यात आली होती.

त्यानंतर पोलिस तपासातून संशयित आरोपी प्रमोद प्रताप खरात व आरोपी अजय उर्फ प्रदीप प्रकाश खरात यांची नावे निष्पन्न करण्यात आली. आरोपी नामे प्रमोद प्रताप खरात व अजय उर्फ प्रदीप प्रकाश खरात यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय बारामती येथे जामीन अर्ज सादर केला असता गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपींविरुद्ध प्राथमिक पुरावे तपासत बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय यांनी दोनही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. तद्नंतर दोन्ही आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले. आणि दिनांक 22 मार्च 2022 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दोनही आरोपींविरुद्ध इतर सर्व गोष्टींची पडताळणी करत आरोपींविरुद्ध सबळ पुरावा उपलब्ध नसल्याने व आरोपींकडून अन्य कोणत्याच गोष्टीची रिकव्हरी नसल्याने रुपये 25000 इतक्या जातमुचलक्यावरती जामीनअर्ज मंजूर करण्यात आला.

याप्रकरणी आरोपींच्या वतीने अ‍ॅड. शैलेश चव्हाण, अ‍ॅड.आकाश पाटील आणि अ‍ॅड.अजिंक्य संगीतराव यांनी काम पाहिले

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *