साऊथचा सुपरस्टार यशचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘ KGF chapter 2’ 14 एप्रिल रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटात संजय दत्त आणि रवीना टंडन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. मात्र, यश मुख्य भूमिकेत आहे. 2018 मध्ये आलेल्या या चित्रपटाच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांमध्ये धमाल केली होती.
यशची गणना कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या अभिनेत्यांमध्ये केली जाते. मात्र, यशाच्या या टप्प्यावर पोहोचण्याचा प्रवास त्याच्यासाठी इतका सोपा नव्हता. यामुळे यशच्या वडिलांना ड्रायव्हरची नोकरी सोडायची नाही. यश कुमार यांचा जन्म 8 जानेवारी 1986 रोजी बोवनहल्ली, कर्नाटक, हसन जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
त्यांचे खरे नाव नवीन कुमार गौडा आहे. मात्र, त्यांनी आपल्या स्टेजचे नाव बदलून यश असे ठेवले. यशचे वडील अरुण कुमार अजूनही कर्नाटकच्या परिवहन सेवेत बीएमटीसीमध्ये चालक म्हणून काम करत आहेत. बस ड्रायव्हरची नोकरी करत असताना अरुणने आपला मुलगा यशला मोठे केलेच शिवाय त्याचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत सुध्दा केली.
यशच्या वडिलांना ड्रायव्हरची नोकरी सोडायची नाही कारण या कामामुळेच त्यांनी आपल्या मुलाला एवढा मोठा अभिनेता बनण्यास मदत केली आहे. यश कुमारला KGF चॅप्टर 2 साठी 25 कोटी रुपये फी मिळाली आहे. यश कुमार आजच्या तारखेला अब्जाधीश आहेत. करोडोंच्या मालमत्तेसोबतच यशकडे बंगळुरूमध्ये एक आलिशान बंगला आणि अनेक महागड्या गाड्या आहेत.
त्याच्याकडे ऑडी Q7 (रु. 1 कोटी) आणि रेंज रोव्हर (80 लाख) सारख्या ब्रँडेड कार आहेत. ‘बाहुबली’ आणि RRR सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितले की यशचे वडील बस ड्रायव्हर होते हे मला माहित नव्हते. जेव्हा मला हे कळले तेव्हा माझ्या मनात यशच्या वडिलांबद्दल आदर वाढला.
यश कुमारने अभिनेत्री राधिका पंडितसोबत लग्न केले आहे.दोघांनी प्रेमविवाह केला आहे. त्यांची पहिली भेट ‘नंदा गोकुळ’ या टीव्ही मालिकेदरम्यान झाली होती. एकत्र काम करत असताना दोघांमध्ये पहिली मैत्री झाली, ज्याचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. त्यानंतर 2016 मध्ये दोघांनी बंगळुरूमध्ये लग्न केले. लग्नाच्या 2 वर्षानंतर यश 2018 मध्ये मुलगी आयराचा पिता झाला.
यानंतर ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांची पत्नी राधिका पंडित यांनी मुलगा यथर्वला जन्म दिला. यशने आपल्या 15 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये जवळपास 20 चित्रपटांमध्ये काम केले आहे.यश, त्याची पत्नी राधिका पंडित यांच्यासमवेत एक फाउंडेशन चालवतो जे गरजूंना मदत करते.
कर्नाटकातील दुष्काळी कोप्पल जिल्ह्यात लोकांना सहज पिण्याचे पाणी मिळावे म्हणून यशने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून या संस्थेअंतर्गत तलाव बांधले. यश हा फक्त रील लाईफ मध्येच नाही तर रिअल लाईफ मध्ये सुध्दा हिरो आहे. तसेच त्याचे वडील देखील कुठल्या हिरो पेक्षा कमी नाहीत.