हौसेला मोल नसतं, असं म्हणतात. चंदीगडमध्ये राहणाऱ्या बृजमोहन या व्यावसायिकाला युनिक नंबरचा शौक आहे. ब्रिजमोहनने आपल्या स्कूटीला व्हीआयपी नंबर मिळवण्यासाठी 15.44 लाख रुपये खर्च केले.
ब्रिजमोहनने 71,000 रुपये किमतीची होंडा अॅक्टिव्हा खरेदी केली आणि त्यासाठी स्पेशल नंबर CH01-CJ-0001 खरेदी केला. आणि व्हीआयपी नंबर मिळवण्यासाठी साडेपंधरा लाख रुपये खर्च केले. नोंदणी आणि परवाना प्राधिकरणामध्ये झालेल्या बोलीमध्ये या व्हीआयपी नंबरला खरेदी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या क्रमांकाची राखीव किंमत 50,000 रुपये होती. व्हीआयपी नंबर्स विकून चंदीगड प्रशासनाला सुमारे दीड कोटी रुपये मिळाले.
ब्रिज मोहन यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी स्कूटी खरेदी केली तेव्हा त्यांना वाटले की चंदीगडचा स्पेशल नंबर गाडीवर असावा. यावर्षी जानेवारीमध्ये CH 01 CH सीरिजमधील 0001 क्रमांकाचा 24.4 लाख रुपयांना लिलाव झाला होता. तो चंदीगडच्या अमन शर्माने विकत घेतला होता. या वेळी नव्या मालिकेसोबत जुने क्रमांकही लिलावात ठेवण्यात आले होते. बृजमोहनने सांगितले की तो एक कार खरेदी करेल आणि हा नंबर ट्रान्सफर करून घेईल.
स्वतःचा आणि मुलांचा छंद पूर्ण करण्यासाठी हा नंबर घेतल्याचे त्याने सांगितले. याआधीही त्यांनी मुलांच्या सांगण्यावरून मोबाईलचा व्हीआयपी क्रमांक घेतला आहे.
आत्तापर्यंतची सर्वात मोठी बोली 2012 मध्ये 0001 क्रमांकासाठी होती. हा नंबर एकाने CH-01-AP सिरीजमधून 26.05 लाख रुपयांना विकत घेतला होता. हा नंबर मर्सिडीज-बेंझ एस-क्लाससाठी खरेदी केला होता. या वाहनाची किंमत एक कोटींहून अधिक होती.