पुणे येथील बालेवाडी स्टेडियम येथे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते दै.सकाळ समूहाच्या वतीनं महाराष्ट्रचा ‘महाब्रँन्ड’ पुरस्कार धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना देऊन गौरविण्यात करण्यात आले, यावेळी महाराष्ट्राचे ५ माजी मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेब, मा.सुशीलकुमार शिंदे साहेब, मा.नारायण राणे साहेब, मा.पृथ्वीराज चव्हाण साहेब व सकाळ समूहाचे प्रतापराव पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
अल्पावधीतच ४ साखर कारखाने यशस्वीरित्या चालवून सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सकाळ समूहाने ‘महाराष्ट्राचा महाब्रॅन्ड’ या पुरस्काने पंढरपूरचे डिव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि धाराशिव साखर साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी पाटील म्हणाले उद्योग क्षेत्रात तरूणांनी वाटचाल करून स्वावलंबी बनावे. अगदी कमी कालावधीत बंद पडलेले उस्मानाबाद, नाशिक, नांदेड आणि सांगोला येथील साखर कारखाने सुरू करून हजारोच्या हाताला काम देत शेतकऱ्यांना न्याय देण्याची भुमिका पाटील यांनी केली आहे. त्यामुळे सहकार टिकला पाहिजे, वाढवला पाहिजे या हेतूने केलेली प्रामाणिक कामगिरीची पोच पावती मिळाली. गुणवत्ता व विश्वासार्था असेलतर ब्रँन्ड बनतो. हा पुरस्कार म्हणजे भूतकाळात केलेल्या कामाचे फळ आणि भविष्य काळात काम करण्यासाठी मिळालेले बळ आहे असे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले.