पंढरपूर येथील भिमनगर कला,क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी विविध पक्ष व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भिमनगर कला क्रीडा व संस्कृतिक तरुण मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच विविध समाजातील बांधवांसाठी अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यासाठी मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अरविंद माने, उपाध्यक्ष अर्जुन माने, खजिनदार विशाल गायकवाड, सचिव युवराज माने, सहसचिव प्रवीण माने, आदित्य माने, सदस्य भारत माने, अनिल कांबळे, पांडुरंग बाबर, सुरज गायकवाड, अक्षय माने, ज्येष्ठ पदाधिकारी चंद्रकांत क्षिरसागर, नितीन माने, दीपक माने, रवी माने, हरी माने तसेच दिलीप चौगुले सर, शिवाजीआप्पा कोळी सर्व सभासद मंडळ आदी उपस्थित होते.