पंढरपूर – कुर्डुवाडी रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा, हा रस्ता गेली 3 वर्षांपासून चालू असून अजूनही काही प्रमाणत कामे राहिली असून ती अद्यावत तसेच पडून आहेत, तर कुठे सिमेंट काँक्रेटचा रस्ता पूर्णपणे उचकटून गेलाय असा सर्व प्रकार पाहूनही महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ झोपी गेल्याचे सोंग करत आहे.
खराब झालेल्या सिमेंट काँक्रेटच्या पॅचवर नव्याने पुन्हा करण्यात आलेल्या रोड RSIIL ही कंपनी रस्ता फोडून काही प्रमाणात फोडून सिमेंट काँक्रीटच्या अभावी गेले पंधरा दिवस रोपळे बस स्थानक असलेल्या पुलानजीक 100 मीटर रस्ता फोडून तसाच ठेवण्यात आला आहे
आतापर्यंत या 100 मीटरच्या एकेरी वाहतूक मध्ये दोन वेळा मोठे अपघात घडले आहेत सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नसली तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या अपघाताची खबर मिळताच दोन दिवसात रस्ता पूर्ण करण्याचे कंपनी यांनी सांगितले,पण आज पर्यंत आठ दिवस झाले तरीही या कंपनीला सिमेंट काँक्रीटच्या अभावी तसाच पडून आहे.
तिथूनच एक किलोमीटर कुर्डुवाडीकडे म्हणजेच यशवंत सागर (उजनी) याचा कॅनॉल असलेला ब्रिज अद्यापही पूर्ण झालेला नाही. ह्या ब्रिजवर दररोज ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर किंवा ट्रक याठिकाणी पलटी होऊन रस्ता पूर्णपणे काही काळ बंद होत आहे.
तेथील काही सुज्ञ ट्रॅक्टर चालकांनी एम एस आर टी सी चे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून देखील अधिकारी आपल्याच मतावर ठाम असल्याचं दिसत आहे
हे सर्व पाहूनही एम एस आर टी सी चे अधिकारी आपली ठाम भूमिका का घेत नाहीत रस्त्याविषयी बांधकाम करण्याला कंपनीला याचा जाब का विचारत नाही यामध्ये नक्की काय गौडबंगाल आहे हे पंढरपूर-कुर्डुवाडी रस्त्यावरील नागरिकांना प्रश्न पडला आहे.
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी येतात आणि कामाची पहाणी न करतात गपचिप निघून जातात. काही प्रमाणात रस्ता दुरुस्तीचे का होईना पुन्हा करण्यात यावे अशी तंबी देऊनही रोडवेज सोल्युशन इंडिया ही कंपनी योग्य रीतीने करण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येते..!