पंढरपूर-कुर्डुवाडी हा रस्ता प्रामुख्याने MSRDC च्या अंतर्गत येत असल्याने गेल्या चार वर्षांपासून याच काम काही ठिकाणी रखडले असता आजही काम पूर्णतत्वाकडे झाले नाहीत.
जे काम झाले तेही निकृष्ट पद्धतीने झाले आहेत.
निकृष्ट झाल्यामुळे पुन्हा रस्ता कटिंग केला गेला असून पण रस्ता कटिंग केल्यानंतर त्याच दिवशी रिपीयर करणे गरजेचे असते पण असे न करता आष्टी ते रोपळे दरम्यान गेली आठ ते नऊ दिवस तसेच ठेवण्यात आल्यामुळें याच नऊ दिवसामध्ये 4 वेळा याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात घडुनही ना msrdc दखल घेत आहेत ना RSIIL ही कंपनी दखल घेत आहे.
रोपळे या गावाजवळील शंभर मीटर पासून कुर्डुवाडीकडे पुलाजवळ 70 मीटर रस्ता कटिंग म्हणजेच उखडून ठेवला आहे. या 70 मीटर मध्ये दोन मोठे अपघात घडूनही डोळे उघडेना, विशेष म्हणजे हा रस्ता उखडून जवळ जवळ 2 महिने झालेत, पण अद्यापही पूर्ण झाले नाही. याच कंपनीला पंढरपूर-कुर्डुवाडी दरम्यान झालेल्या निकृष्ट कामाचे पुन्हा रस्ता उखडून नवीन पॅच करण्याचे आदेशही दिले आहेत, पण जुनेच पॅच रिपीयर होत नाही तर नवीन कसे करणार, यामध्ये msrdcचे अधिकारी सुद्धा सर्व बाबी कळूनही डोळे झाकल्याचे दिसत आहे. यांचे डोळे उघडण्यासाठी अजून किती जणांचे हे अधिकारी बळी घेतील की जेणेकरून या कामांकडे लक्ष देतील, असा रोपळे नागरिकांकडून बोलले जात आहे. चक्क एका नागरिकांनही तर msrdc च्या अधिकरींनी “निर्लज्यपणाचा कळस आणला आहे” याच भाषेत बोलले आहे.
पाहूया आता तरी झोपी गेलेले अधिकारी जागे होऊन याकडे लक्ष देतील का हेही पाहणे गरजेचे आहे.
काही पत्रकारांनी या कामाबद्दल विचारले तर मी आमच्या वरिष्ठांना कळवतो असेच सांगण्यात येते, पण याची पूर्तता मात्र कुठे होताना दिसत नाही. वरिष्ठ अधिकारी यांचा फोन नंबर विचारला असता ते असे सांगतात की माझ्याकडे नंबर नाही,आणि माझा नंबर कुणाला देऊही नका, अशी सक्त तंबी देण्यात आली आहे असे कनिष्ठ अधिकारी बोलतात. यावरूनच दूध का दूध पाणी का पाणी नागरिकांना कळत असल्याचे ठामपणाने सांगत आहे.
रोपळे गावातील नागरिकांकडून लवकरात लवकर काम चालू करून होणारे अपघात व जीवितहानी टाळावी अशीही विनंती करण्यात आली आहे नाहीतर येणाऱ्या आठ दिवसात आक्रमकपणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.