शेतकरी ग्राहकांच्या सेवेसाठी समृद्धी ट्रॅक्टर तत्पर असेल – युवा नेते अभिजीत पाटील
नेहमी शेतकऱ्यांच्या हित जोपासणारी ही संस्था विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असते. यावेळी विजेते म्हणून श्री.अमोल पवार मेथवडे, श्री.नवनाथ पवार कडलास, श्री.राहूल इंगळे घरनिकी, श्री.लक्ष्मण भोसले पापरी, श्री सुनील शिंदे बाभूळगाव, श्री.नागनाथ जुगदार पेनूर बक्षीस देऊन ग्राहक लकी ड्रॉचे बक्षीस देण्यात आले.
पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ झाला असून शेतकरी हा समृद्धीमय व्हावा या भावनेतून हि संकल्पना केली आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासण्यात समृद्धी ट्रॅक्टर नेहमी कार्यरत असते. नववर्षाच्या शुभेच्छा देत धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी धाराशिव साखर कारखान्याचे संचालक श्री.अभिजीत कदम, मॅनेजर श्री.सोमनाथ केसकर, फुलचिंचोलीचे अशोक जाधव, सोनालिका कंपनीचे श्री.कुलदीप सिंग, श्री.सुबोध कुमार, श्री.साहिल शिंगला सर, श्री.सुरेंद्र ठाकूर सर आदी शेतकरी ग्राहक उपस्थित होते.